कोरोनाची लस फेब्रुवारी महिन्यात दाखल होणार ?
कोरोना महामारीने भारत देशच नव्हे तर संपूर्ण जग हैराण झाले आहे. लाखोंच्या संख्येने मृत्यू व करोडोंच्या संख्येने बाधित रुग्ण जगभरात त्रास सहन करत आहेत. ना ना प्रकारच्या उपचार पद्धती या रोगतून रुग्णांना वाचविण्यासाठी जगभरात वापरल्या गेल्या. परंतु यावरील ठोस औषध निर्माण करण्यास अद्यापही हवे तसे यश मिळाले नाही.
परंतु अनेक मोठ्या वैद्यकीय संस्था आणि शास्त्रज्ञ त्यांचे कसोटीचे प्रयत्न करीत आहेत. भारतात भारत बायोटेक व इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त प्रयत्नातून कॉव्हाक्सिन ही कोरोनावरील लस फेब्रुवारी पर्यंत विकसित होऊन देशात उपलब्ध होईल, असा अंदाज आयसीएमआरचे शास्त्रज्ञ रजनीकांत यांनी दिली आहे