Skip to content Skip to footer

सीएसकेचं नेतृत्व यापुढे देखील धोनीच्याच खांद्यावर असणार ; श्रीनिवासन

सीएसकेचं नेतृत्व यापुढे देखील धोनीच्याच खांद्यावर असणार ; श्रीनिवासन

महेंद्रसिंह धोनी आणि चैन्नई संघाचा फॉर्म यंदाच्या आयपीएल हंगामात संपूर्णतः बिघडल्याने संघाची कामगिरी विशेष अशी राहिली नाही. त्यामुळे चैन्नई संघ आयपीएलच्या यंदाच्या सपर्धेतून बाहेर ही पडला आहे. या सर्व गोष्टींवरून महेंद्रसिंह धोनी कर्णधार पद सोडेल किंवा तो आयपीएल मधूनही संन्यास घेईल अशा चर्चा होत होत्या. परंतु त्यावर स्वतः धोनीने मी आयपीएल खेळणार असं धडक उत्तर दिले होते.

परंतु सुरू असलेल्या त्याच सर्व चर्चांवर चैन्नई संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धोनीच या संघाचा कर्णधार आहे आणि पुढे ही त्याच्याच नेतृत्वात सीएसके खेळणार, असे त्यांनी सांगितले आहे. धोनीने संघातील अनेक गोष्टींबाबत मला अनेक गोष्टी सांगितल्या. त्या बोलण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता हे मला माहिती आहे. त्याने सर्व मुद्द्यांवर माझ्याशी चर्चा केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5