Skip to content Skip to footer

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय काढले OLX वर विक्रीला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत विजय झाले आहे. तसेच या मतदार संघाच्या क्षेत्रात त्यांचे क्षेत्रीय कार्यालय सुद्धा आहे. मात्र आता याच वाराणसी मतदार संघात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे.

काही कुरापत करणाऱ्या व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी येथील संसदीय कार्यालय OLX वर विक्रीला काढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी येथील क्षेत्रीय कार्यालयाचे फोटो घेऊन ते फोटो पुर्नविक्री साइड असलेल्या OLX वर अपलोड करण्यात आले आहे. तसेच या कार्यालयाच्या विक्रीची किंमत ७.५ कोटी लावण्यात आलेली आहे.

दरम्यान हा प्रकार समजताच पोलिसांनी OLX वरून सदर जाहिरात काढलेली आहे. तसेच ही जाहिरात OLX वर टाकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. एकूण चार जणांना अटक करण्यात आलेली असून एकाला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

Leave a comment

0.0/5