Skip to content Skip to footer

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पद, या नेत्यांची नावे शर्यतीत

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या नियुक्तीला आता गती मिळताना दिसत आहे. त्यात लवकरच मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर नवा चेहरा विराजमान होणार आहे. काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील तसेच मुंबईतील पक्ष संघटनेत बदल करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. त्यामुळे अनेकांनी अध्यक्ष पदासाठी मोर्चबांधणी सुरु केली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीसाठी गुरुवारी दुपारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ व महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यात सुमारे दीड तास महत्त्वाची बैठक झाली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंह मनहास आणि कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांची नावे आघाडीवर आहेत. या बैठकीत त्यांच्या नावावर सविस्तर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

येणाऱ्या बृहमुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुंबईत पक्षाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी मराठी चेहरा देणार की पुन्हा अमराठी अध्यक्षाची निवड करणार हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.

Leave a comment

0.0/5