Skip to content Skip to footer

पाकिस्तान हा एक देश नसून एक प्रकारे ती खंडणी उकळणारी टोळीच

मुंबई: दहशतवादविरोधी लढाईतील मित्र म्हणून अमेरिकेने मागच्या पंधरा वर्षांत पाकिस्तान च्या झोळीत तब्बल सवादोन लाख कोटींची आर्थिक मदत घातली. मात्र एवढी अफाट खंडणी वसूल करूनही पाक अमेरिकेला सदैव मूर्खच बनवत राहिला. भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर एवढ्या उशिरा का होईना, पाकिस्तानची आर्थिक रसद रोखण्याचे शहाणपण महासत्तेला सुचले त्याचे स्वागतच करायला हवे, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनातून स्पष्ट करण्यात आले.

आजच्या सामानातून अमेरिका आणि पाकिस्तानमधील आर्थिक व्यवहारावर भाष्य करण्यात आले. पाकिस्तान हा एक देश नसून एक प्रकारे ती खंडणी उकळणारी टोळी असल्याचे शिवसेने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या निर्मितीपासून अगदी कालपर्यंत वेगवेगळ्य़ा गोंडस नावाखाली अमेरिका पाकिस्तान्यांची घरे भरत होती. मात्र अव्याहत सुरू असलेली ही रसद थांबवून पाकिस्तानचे नाक दाबण्याचे धोरण आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने स्वीकारलेले दिसते, असे आजच्या सामनातून स्पष्ट करण्यात आले.

Leave a comment

0.0/5