Skip to content Skip to footer

चंद्राबाबू नायडू वॉरंट काढणाऱ्या न्यायाधीशांना धमकी

धर्माबादधर्माबादचे प्रथमवर्ग न्यायाधीश एन.आर.गजभिये यांना अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे, गजभिये यांनी बाभळी बंधारा परिसरात चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केला होता. याच प्रकरणात न्यायाधीशांवर दबाव टाकण्यासाठी ही धमकी देण्यात आली आहे. पैसे हवे असतील तर आम्हाला सांगा आम्ही पैसे देऊ, पण जर आमचं ऐकलं नाहीत तर ठार मारू असं धमकी देणाऱ्या पत्रात लिहलं आहे. आमचे तगडे राजकीय संबंध आहेत, त्यामुळे आमच्याशी पंगा घेऊ नका असंही या पत्राद्वारे न्यायाधीशांना धमकावण्यात आलं आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरुध्द वॉरंट जारी करण्यात आलं होतं. याचाच राग आल्याने ही धमकी देण्यात आली आहे. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर हे पत्र पाठवणाऱ्याचा पोलिसांनी शोध सुरू केला असून न्यायाधीश गजभिये यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी बंधाऱ्याचे आंदोलन पेटले असताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत आंदोलन केलं होतं. या प्रकरणी नायडूंसह एकूण 17 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा बंधारा बांधण्यास नायडू यांचा विरोध होता, त्यांनी बंधारा बांधल्यास तो बॉम्बेने उडवून देण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी न्यायाधीशांनी नायडूंना ३२ वेळा हजर राहण्यास सांगूनही नायडू न्यायालयात हजर राहिले नव्हते. अखेर गजभिये यांनी त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं.

Leave a comment

0.0/5