Skip to content Skip to footer

नाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी

लखनऊ | संपूर्ण अयोध्येत योगी सरकार दारू आणि मांस-मटणावर बंदी आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. अयोध्येतील आणि अन्य ठिकाणाच्या साधू-संतांनी तशी मागणी सरकारकडे केली आहे.

अयोध्या शहरात आधीपासूनच दारू आणि मांस-मटणावर बंदी आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचं नाव फैजाबाद बदलून अयोध्या केलं. त्यामुळेच आता संपूर्ण जिल्ह्यात तशी बंदी आणावी, अशी मागणी या साधू-संतांनी केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली.

दरम्यान, संतांच्या मागणीवर सरकार विचार करत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र या मागणीवर सरकार काय निर्णय घेतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a comment

0.0/5