दिवसेंदिवस मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रंग चढत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बुंदेलखंड येथे प्रचाराचा नारळ फोडला. सत्तेची चावी जर काँग्रेसच्या हातात दिली तर त्यापुढील १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेसच्या हातात जनतेने सत्ता द्यावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. तसेच काँग्रेसचे सरकार आले तर त्यापुढील १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. एकंदरीत मध्यप्रदेश निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावल्याचे पाहायला मिळत आहे.