Skip to content Skip to footer

गाजा भीषण चक्रवती वादळामुळे 22 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – तामिळनाडूच्या किनारपट्टी पार केलेल्या गाजा भीषण चक्रवती वादळाने राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वादळामुळे 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युध्द पातळीवर सुरू आहे.

तामिळनाडू राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यांच्या माहितीनुसार, मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्‍यक तेवढी शिबिरे उभारली असून सुमारे 80,000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गाजा वादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हास्तरावर 1077 तर राज्यस्तरावर 1070 हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून उपलब्ध करून दिला आहे.

वादळ शुक्रवारी सकाळी तामिळनाडू राज्यात पोहचले. तेव्हा वाऱ्याचा वेग हा ताशी 100 ते 120 किमी ताशी असा होता. वादळामुळे कडलूर, नागपट्टिनम, थोंडी, पम्बन तसेच पम्बन, कराईकल आणि पॉंडेचेरी मधअये तीन ते आठ सेमी पाऊस पडला. अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्याने वीज गेली आहे.

Leave a comment

0.0/5