Skip to content Skip to footer

राजकारणात प्रियंका गांधी यांची सक्रिय ‘एन्ट्री’

नवी दिल्ली – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सरचिटणीसपदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारी पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांचा या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश झाला असून हा काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने दोन सरचिटणीस नियुक्त केले आहेत. त्यानुसार उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी ज्योदिरादित्य सिंधिया यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रियंका गांधी एक फेब्रुवारीपासून आपली जबाबदारी सांभाळतील. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. सध्या राहुल गांधी उत्तर प्रदेशातच आहेत. येथे सपा आणि बसपा यांनी यापूर्वीच युतीची घोषणा केली आहे.

Leave a comment

0.0/5