Skip to content Skip to footer

मी हॅकर नाही, मी केवळ गोपीनाथ मुंडेची कन्या आहे – पंकजा मुंडे

मुंबई – लंडनस्थित संगणक हॅकर शुजा याने ईव्हीएम घोटाळा प्रकरणाची माहिती मिळाल्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावर बोलताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘माझ्यासमोर काय बोलावे हा प्रश्न पडला आहे, या गोष्टीचे भांडवल करू इच्छिणारी राजकारणी मी नाही, मी ना हॅकर आहे, मी केवळ गोपीनाथ मुंडेची कन्या असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे एका कन्येला कठीण आहे. आमच्या कुटुंबीयांना या सगळ्या मानसिक त्रासातून जावे लागत आहे, हे त्रासदायक असल्यामुळे या विषयाचे भांडवल करू नये, माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी स्वतः तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशीही झाली आहे. मग याबद्दल आता काही बोलणे चुकीचे आहे. तसेच शुजाच्या आरोपाची आणखी काही चौकशी करायची असल्यास, देशातील मोठे नेते याची दखल घेतील आणि त्यावर योग्य ते निर्णय होईल, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.

Leave a comment

0.0/5