Skip to content Skip to footer

शिरूर मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादीला उमेदवार मिळेना…

येणाऱ्या गतवर्षी लोकसभेच्या निवडणुकी मध्ये शिवसेना-भाजपा पक्षा तर्फे संभाव्य उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्याची हालचाल चालू झालेली आहे. मागच्या कामाचा आलेख पाहता येणाऱ्या निवडणुकीला पाटील यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित होऊ शकते. परंतु शिवसेनेच्या विरुद्ध असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला पाटील यांच्या तोडीस तोड उमेदवार अजून सुद्धा मिळालेला नाही आहे म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीला बाहेरून उमेदवार आयात करण्याची गोची काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षावर आलेली आहे असेच बोलले जात आहे.

शिऊर मतदार संघात मागील साडेचार वर्षाच्या कालखण्डात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकहिताची अनेक कामे केलेली आहे. आपल्या मतदार संघात विमानतळ आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु तेथील ओबड-धोबड जमिनीची रचना आणि जवळच असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगामुळे विमान तळाची जागा बदलण्यात आलेली होती तसे पत्र सुद्धा विमान पतन प्राधीकरणाने आपल्या वेबसाईडवर जाहीर केले होते पण पाटील यांनी विमान तळ आपल्या मतदार संघात आणण्यासाठी पूर्ण जोर लावलाच होता. शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती आणि शेतकरी यांच्याशी नाते किती घट्ट आहे, याची प्रचिती तेथील जनतेला आलेली आहे सतत पाठपुरवठा करत बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी विशेष लक्ष देत आहेत.

येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर आज त्यांच्या विरुद्ध कोणीही उमेदवार उभा राहण्यास तयार नाही. म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादी पाटील यांच्या विरुद्ध उभे राहण्यासाठी तगड्या उमेदवाराचा शोध घेत आहे परंतु त्यांच्या विरुद्ध कोणीही उभे राहिले तरी त्या उमेदवाराचा पराभव निश्चित होणार अशीच भावना तेथील जनतेची आहे. आज लोकहिताच्या कामासाठी आम्ही कटीबद्ध आहे हीच भावना आज पाटील यांच्या बोलण्यातून जाणवत आहे आणि बाळासाहेबांचा भगवा पुन्हा शिऊर मतदार संघात फडकणारच हेच आजची चालू स्थितीची राजकीय परिस्थिती सांगत आहे.

Leave a comment

0.0/5