Skip to content Skip to footer

१५ लाख गायब, युवकांचे रोजगार गायब, आता राफेलच्या फायली देखील गायब- राहुल गांधी

नवी दिल्ली: राफेल व इतर सर्व मुद्द्यांवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्ला केला. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी सर्व काही गमावले आहे. युवकांचे रोजगार गायब, लोकांच्या खात्यात येणारे 15 लाख गायब, आणि आता राफेलच्या फायली देखील गायब झाल्या. शेतकऱ्यांचे पैसे गिळून गेले, डोकलाम गहाळ झाला आणि सरकारने काहीच केले नाही. अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राफेलचा पैसा चोरला गेला, आणि आता फाइल चोरी झाली आहे. मोदीजींवर एफआयआर दाखल व्हायला हवी. मात्र एफआयआर दाखल होत आहे चोरीचा शोध घेणाऱ्या मिडीयावर. याला म्हणतात, ‘अंधेर नागरी, चुप्ता राजा’ अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरवर केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, 30 हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्याची कोणतीच चौकशी होत नाही आहे. सरकारचे फक्त एकच काम आहे. मोदींना वाचवण्याचे. नरेंद्र मोदी यांची चौकशी व्हायला हवी. राफेल व्यवहारात मोदींनी उशीर केला कारण त्यांना त्यांचे मित्र अंबानींना पैसे द्यायचे होते असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक येथील सभेत बोलताना काँग्रेस नेत्यांना पाकिस्तानचे पोस्टर बॉय म्हटले होते. त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही नवाज शरीफ यांना बोलावले? आम्ही आईएसआयला बोलावले. आणि आम्हाला पोस्टर बॉय असे म्हटले जात आहे. ते पाकिस्तानचे पोस्टरबॉय आहेत, आम्ही नाही.

Leave a comment

0.0/5