Skip to content Skip to footer

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या’ , मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळपासून सुरु असलेलेया महाराष्ट्र विधानसभा बरखास्त होणार असल्याच्या चर्चांना पूर्ण विराम लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा आज सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरुन बरेच तर्कवितर्कही लढवले जाताहेत. परंतु, हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे म्हटलं आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री दिल्लीत होणाऱ्या उच्चस्तरीय समितीकडून घेतला जाईल, अशी जोरदार आज सकाळपासून सुरू होती. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होणार का, याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र ही चर्चा संपूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख नेत्यांच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मागील चार दिवसांमध्ये सरकारकडून अनेक महत्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. तसेच आज आणि उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास ५० लोकप्रिय निर्णय घेतले जाणार असल्याचं बोलल जात आहे.

Leave a comment

0.0/5