Skip to content Skip to footer

अमरावती येथे दिव्यांगांना शिवसेना खा. अडसूळ यांच्या मार्फत ३ कोटीचे साहित्य वाटप.

अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दिव्यांग सेवा महाअभियान १२ जानेवारीपासून सुरु करण्यात आले आहे. हा महाअभियान कार्यक्रम गाडगेबाबा स्मृती भवनात येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी मोदीजींनी सुरु केलेल्या व खासदार आनंद अडसूळ यांनी प्राधान्याने अमरावती लोकसभा मतदार संघात राबविलेल्या दिव्यांग व वयोश्री योजनेच्या अभियानाबद्दल सर्व स्थरातून खा. आनंदराव अडसूळ यांचे कौतुक करण्यात येत आहे. आमदार श्रीकांत देशपांडे यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांसाठी महाअभियान घेऊन लोकोपयोगी कार्य करणार्‍या खासदारांची सतत सेवा जिल्हावासीयांना लाभायला हवी आहे. यासाठी जिल्हावासीयांना खासदार अडसुळांच्या पाठीशी उभे राहायला हवे असे आवाहन केले आहे. अडसूळ यांनी यावेळी उपस्थितांना साहित्य वाटपानंतर सतत दीनदुबळ्यांना व गोर गरिबांना आनंददायी जीवन जगण्यासाठी माझा प्रयत्न असतो असे ही बोलून दाखविले.

नाणार प्रकल्पग्रस्थांना दिलेला शब्द उद्धव ठाकरे यांनी पळाला.

 

९०० कर्णयंत्र, ३५० तीनचाकी सायकली, १५०० कुबड्या, १२०० व्हील चेयर, ३०० स्मार्ट केन, अंध बांधवांसाठी ४०० स्मार्ट मोबाईल फोन, ४०० ट्री पॉट, १५० कृत्रिम दात, १००० एल्बो क्राचेस, ८५० वालकर्स, २०० सीपी चेयर्स, इत्यादी साहीत्य व ४४ लाख लक्ष रुपयांचे २५ हजार चष्म्यांचे लोकोपयोगी वाटप करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा स्मृती भवनात या साहित्य़ाचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांनी खा. आनंदराव अडसूळ यांच्या कामाचे कौतुक सुद्धा केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यात महाआरोग्य अभियान मागील महिन्यात जिल्ह्यात राबविले असताना १ लाख १० हजार लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतल्याचे आवर्जून सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5