Skip to content Skip to footer

राष्ट्रवादी म्हणते; कागदपत्रांची होते चोरी, अशी कशी ही चौकदारी.!

मुंबई | बुधवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात राफेल करारासंबंधीची महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचं सागितलं आणि त्यानंतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची एकच झोड उठवली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस मागे राहिली तरच नवल.!

कागदपत्रांची होते चोरी, अशी कशी ही चौकदारी. असं ट्वीट करत राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे.

या ट्वीटमध्ये, तुम्ही कसे पाच वर्षे राजीनामे जपून ठेवले. माझ्याकडून तर राफेलचे पेपरही हरवले, असं नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना बोलत आहेत, असं दाखवून राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेच्या मर्मावरचं बोट ठेवलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही गेल्या काही दिवसांपासून जाहीर सभांमधून राफेलवर आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. राफेल मुद्द्यावर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजेे अशी भूमिका पवारांनी घेतलीय.

Leave a comment

0.0/5