Skip to content Skip to footer

राष्ट्रवादी पक्षाचे स्टार प्रचारक- राज ठाकरे

९ मार्च महराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात घोषणा करतील असेच सर्वांना वाटेत होते. परंतु राज ठाकरे यांच्या बोलण्या नंतर समस्त मनसैनिकांचे आणि राज ठाकरे यांना मानणाऱ्या मराठी मानसाची घोर निराशा झालेली होती. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून पुलवामा हल्ला हा नरेंद्र मोदी यांच्याच सरकारने घडवला आहे असा आरोप पुन्हा एकदा त्यांच्यावर लावलेला आहे. त्यामुळे पुलवामा येथे झालेल्या हल्यात मुत्यूमुखी पडलेल्या शहिदांचा कुठेतरी राज ठाकरे यांनी अपमान केला आहे असेच राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून आपण येणाऱ्या निवडणुकीला मोदी यांना विरोध करणार आहे असे हे आपल्या भाषणात बोलून दाखविले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला राज ठाकरे हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराला भाषण कराताना दिसले तर महाराष्ट्रातील मराठी माणसाला आश्चर्य वाटायला नको.त्यामुळे राज ठाकरे यांचा बोलविता धनी कोणीतरी दुसरा आहे आणि त्या बोलविता धान्यच नाव शरद पवार आहे हे सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे असेच आज बोलले जात आहे.

पुढे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर आरोप करून झालेला हल्ला हा भाजपा सरकारनेच केलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसात अजून एक हल्ला होऊ शकतो अशी शक्यता राज ठाकरे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा देशाच्या जवानांनांचा अपमान केलेला आहे. राज ठाकरे जवानांवर झालेल्या हल्याचा मोदी यांच्यावर आरोप करून पुन्हा एकदा आपली राजकीय पोळी भाजताना दिसून आले. पुढे जागेची मागणी करतात “एक देता की, दोन देता” अशी मागणी करायला आपण प्रकाश आंबेडकर नाही अशी खरपूस टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केली होती.

Leave a comment

0.0/5