Skip to content Skip to footer

शिवसेना पक्षाचा आज ५४ वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांशी संवाद…!

शिवसेना पक्षाचा आज ५४ वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांशी संवाद…!

शिवसेनाप्रमुख, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापन दिन! वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमत्रीiपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामूहिकरित्या साजरा होणार नाही. त्याऐवजी शिवसैनिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तळागळात प्रयत्न करावेत. शिवसेना शाखेत आधीपासूनच रुग्णांची तपासणी करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहेच, आता इतर गरजूंनाही मदतीचं सत्र सुरुच ठेवण्याचं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

५४ वर्षांच्या शिवसेनेची भविष्यातील वाटचाल कशी असेल, या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करतील. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी १९६६ मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेने गेल्या ५४ वर्षात महाराष्ट्रासह देशभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. १९९५ मध्ये युती सरकारनंतर आज २५ वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात आहे.

Leave a comment

0.0/5