आगामी लोकसभा निवडणुकीला राज ठाकरे हे युतीच्या उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादी सभेला हजेरी लावणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहे तशी अधिकृत घोषणा राज ठाकरे यांनी केली नाही तरी राज ठाकरे यांच्या बोलण्यातून तसे जाणवत आहे त्यामुळे अनेक भागात वैर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रचाराला मनसे कार्यकर्ते कसे काय जाणार आणि प्रचार करणार म्हणूनच अनेक कट्टर मनसे सैनिकांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन कायमचा मनसेला राम-राम ठोकला आहे. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे.
९ मार्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला राज ठाकरे काही तरी आगामी लोकसभा निवडणुकी बद्दल भाष्य करतील असेच सर्व कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु राज ठाकरे यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवर टीका करून उघड उघड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूरक असे वतावरनच निर्माण केले होते. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात पुन्हा एकदा सुरक्षा सल्लागार राजीव डोवाल यांच्यावर आरोप लावून पुलवामा येथे झालेल्या जवानांच्या हल्ल्याला राजकीय षडयंत्र म्हणून जवांनांचा अपमान केलेला आहे.
आज राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार याचे मैत्रीपूर्ण संबंध साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. कुठेतरी राज ठाकरे राजकीय सल्ला शरद पवार यांच्या कडून घेत असल्याचे राज ठाकरे यांच्या वागण्यातून जाणवत आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला राज ठाकरे राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करताना दिसणार आहे अशीच चर्चा सध्या बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे जेथे-जेथे वैर आहे तिथे कसे काय मनसेचे कार्यकर्ते प्रचार करणार, त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे असेच बोलले जात आहे