Skip to content Skip to footer

काँग्रेस पक्षाशी आमचा काहीही संबंध नाही- बहन मायावती

लोकसभा निवडणुकीला काँग्रेस देशातील इतर सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षाला बरोबर घेऊन भाजपाच्या युतीला टक्कर देण्यासाठी महाआघाडी स्थापन केली होती. परंतु या महाआघाडीशी आमचा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी खुलासा केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला उत्तरप्रदेश राज्यात काँग्रेस पक्षाला तगडे आव्हानच असणार आहे. आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही, सपा-बसपा आघाडी भारतीय जनता पार्टीशी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसाठी सात जागांवर उमेदवार उभे करणार नसल्याची चर्चा आहे त्यावर बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये असा इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेस आणि आमच्यात कोणत्याही तडजोडी अथवा आघाडी नाही, हे बहुजन समाज पार्टी नेत्या मायावती यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून उठवण्यात येत असलेल्या अफवांना आमचे कार्यकर्ते बळी पडणार नाही. काँग्रेसने उत्तर प्रदेशात सर्वच सर्व ८० जागांवर निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करुन स्वबळावर निवडणुका लढवाव्या. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी मिळून भारतीय जनता पार्टीशी लढण्यात पूर्णपणे सक्षम आहे असे मत सुद्धा बहन मायावती यांनी बोलून दाखविले आहे.

काँग्रेस येणाऱ्या लोकसभेला बहुजन पक्षाच्या मागे असणाऱ्या बहुजन मतांवर डोळा ठेऊन समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांना महाआघाडीत घेण्यासाठी उस्सुक होती. सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी २ जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे, रायबरेली आणि अमेठी जागांवर सपा-बसपा आघाडी उमेदवार उभे करणार नाही. त्यामुळे सपा-बसपा यांच्या निर्णयाचा सन्मान राखत आम्ही देखील त्यांच्या आघाडीसाठी 7 जागांवर उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकारांना काँग्रेस उत्तरप्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांनी दिलेली आहे.

Leave a comment

0.0/5