Skip to content Skip to footer

मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार….

आगामी लोकसभा निवडणुकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? या प्रश्नाकडे सर्व मनसे सैनिकांचे लक्ष लागले होते. तसेच ९ मार्च रोजी झालेल्या आपल्या वर्धापन दिन सोहळ्याला लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा करतील अशीच सर्वांना अपेक्ष होती. परंतु तेव्हा सुद्धा राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुक संदर्भात मौन बाळगले होते. मंगळवारी होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्याला राज ठाकरे घोषणा करतील अशीच बातमी सर्वत्र पसरलेली असताना राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला मनसे उतरणार नाही असे आपल्या अधिकृत पत्रकाद्वारे पत्रकार आणि मीडियाला कळविले आहे.

९ मार्च रोजी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आपल्या वर्धापन दिन सोहळ्याला भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला राज ठाकरे भाजपा पक्षाच्या विरोधात मनसे उमेदवार उभे करतील असेच सर्वांना वाटत होते. परंतु राज ठाकरे यांनी लोकसभेला माघार घेऊन येणाऱ्या निवडणुकीला कोणाला मदत करणार हे उद्याच्या मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्याला जाहीर करतील. परंतु ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूरक अशीच असेल हे दिसून येत आहे.

राज ठाकरे यांनी मंगळवारी पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केला आहे. राज ठाकरे काँग्रेस आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्याची चिन्हे आहेत. ९ मार्चला झालेल्या मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकांबाबत नंतर बोलेन असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला होत. हा सस्पेन्स आजच संपला असून, १९ मार्चला राज ठाकरे हे काँग्रेस आघाडी किंवा राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या तयारीत असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे.

Leave a comment

0.0/5