मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मधून अजित पवार यांचे पुत्र आणि शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांचे नाव जाहीर झालेले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांनी मावळ भागाचा दौरा करण्यात पिता-पुत्र व्यस्थ असताना दिसत आहे. काल पार्थ पवार यांनी एकवीरा आईचे दर्शन घेतलेले होते परंतु येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आई एकवीरा पवार यांच्या नातवाला पावणार का? हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला दिसून येणार आहे. खालापूर, पनवेल आणि कर्जत येथे जाऊन शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मदतीसाठी मनधरणी करताना अजित पवार दिसत होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला शेकापाचे नेते अजित पवार यांच्या पुत्राला मदत करणार का हे पाहावे लागेल.
एका नातूंसाठी पवारांची माघार तर, दुसरा नातू म्हणतो साहेब तुम्हीच लढा
कर्जत येथील सभेत ५-२५ कार्यकर्ते वगळता सगळय़ा खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे अजित पवार आणि पार्थ पवार यांना रिकाम्या खुर्च्यांपुढेच भाषण करावे लागले. त्यामुळे मावळ मधील जनतेने पार्थ पवार यांना नाकारले आहे असेच चित्र दिसून येत आहे. मावळ मतदार संघात शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या दांडग्या कामगिरीमुळे त्यांना तेथून बारणे यांना हरवने इतके सोपे नाही आहे. आज त्यांच्या कामगिरीमुळेच त्यांना “संसदरत्न” या पुरस्कारने गौरवण्यात आलेले होते. त्यामुळे येणारी निवडणूक पार्थ पवार यांना जड जाणार हे चित्र कालच्या खाली असलेल्या सभेच्या खुर्च्यां वरून दिसून येत आहे.