वर्धापन दिन विशेष: जाणून घ्या शिवसेनेची ५३ वर्षे आणि ५३ गोष्टी

shivsena 53 years 53 things

वर्धापन दिन विशेष: जाणून घ्या शिवसेनेची ५३ वर्षे आणि ५३ गोष्टी

१) शिवसेना असा जगातील एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाच्या नावावर एकाच दिवसात तब्ब्ल २५ हजार ६५ बाटल्या रक्तसंकलन करण्याचा विक्रम रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलेला आहे.

२) वांद्रे-वरळी सी-लिंक हा समुद्री रास्ता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या यांच्या संकल्पनेतून साकारलेला आहे. त्याचं भूमिपूजन बाळासाहेबांनीच केलं होतं.

३) मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहर जोडण्यासाठी “एक्सप्रेस वे” हा रस्तादेखील बाळासाहेबांच्या अप्रतिम दूरदृष्टीचा नमुना आहे. हा रस्ता १९९५ च्या युती सरकारच्या कार्यकाळात साकारला. नितीन गडकरींना “रोडकरी” अशी उपमाही यांचं कामांमुळे मिळाली.

४) मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरांत उड्डाणपूल साकारण्याची संकल्पनाही शिवसेनेचीच आहे.

५) १९९५ च्या युती सरकारच्या काळात केवळ एका रुपयात जेवण देणारी “झुणका-भाकर” केंद्रं उभारून अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्यांनाही दोन वेळचं जेवण मिळू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली होती.

६) सामान्य नागरिकांना महागाईची झळ लागू नये यासाठी पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याची किमयाही १९९५ च्या शिवसेना सरकारने करून दाखवली होती.

७) शिवसेनेने स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या माध्यमातून लाखो मराठी मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्या. इतर कोणत्याही पक्षाने मराठी माणसाला इतक्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या देण्याचं काम केलेलं नाही.

८) दुष्काळ हा महाराष्ट्रासमोरील अत्यंत मोठा प्रश्न आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने आर्थिक मदत आणि धान्य, चारा, पाण्याच्या टाक्यांचे वाटप करणारा एकमेव पक्ष शिवसेना आहे.

९) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्न शेतकरी आत्महत्येचं प्रमुख कारण आहे. शिवसेनेने “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना” राबवत हजारो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह मोफत लावले. एवढच नव्हे तर त्यांना मंगळसूत्र, आहेर, रुखवत आणि इतर संसारुपयोगी वस्तू नवीन जोडप्यांना मोफत दिल्या आणि हजारो-लाखो वऱ्हाडींच्या जंगी भोजनाची सोय केली होती.

१०) शिवसेनेच्या शाखांचं जाळं हा शिवसेना संघटनेतील महत्वाचा भाग आहे. या शाखा आजही सामान्य जनतेचे प्रश्न कोणत्याही अपेक्षेशिवाय सोडवतात. सामान्य जनतेला न्याय मिळण्याचं ठिकाण म्हणून शिवसेना शाखांकडे पाहिलं जातं.

११) शिवसेनेच्या शाखांबरोबरच शिवसेनेच्या रुग्णवाहिका या सामान्य जनतेच्याच नव्हे तर सुपरस्टार अमिताभ बच्चनसारख्या लोकांच्याही मदतीला धावून गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. खुद्द अमिताभ बच्चन सुद्धा कुली चित्रपट करताना झालेल्या अपघातानंतर मला न्यायला कोणतीही ऍम्ब्युलन्स नव्हती, त्यावेळी शिवसेनेची ऍम्ब्युलन्स आली नसती तर मी आज जिवंत दिसलो नसतो अशी आठवण वेळोवेळी सांगतात.

१२) दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा बंद पाडण्याची धमकी देताच “मी हज यात्रेकरू कसे जातात ते पाहतो” अशी गर्जना करत जे सरकारला जमलं नाही ते मातोश्रीवरून केलं होतं आणि अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली.

१३) कडवट हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रीयत्व हा शिवसेनेचा कायम अजेंडा राहिला आहे. त्यातूनच जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना आळा घालत नाही तोपर्यंत पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांना महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही अशी गर्जना शिवसेनेने वेळोवेळी केली. त्यासाठी वानखेडे मैदानाची कडेकोट सुरक्षा भेदून खेळपट्टी उखडणं, बैठक उधळणं अशी प्रखर आंदोलनं शिवसेनेने केली. पाकिस्तानी कसुरींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सुधींद्र कुलकर्णींना काळी शाई फासून निषेध करणारी शिवसेनाच होती. यामुळेच आज भारत-पाक सामने होत नाहीत शिवाय पाकिस्तानी व्यक्तीला महाराष्ट्रात आणण्याचे धाडस कोणी दाखवत नाही.

१४) प्रादेशिक अस्मिता हा शिवसेनेचा प्रमुख मुद्दा राहिला आहे. मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रपासून वेगळे न होण्यात शिवसेनेची प्रमुख भूमिका आहे.

१५) बेळगाव, कारवार इत्यादी गावांसह अखंड महाराष्ट्र व्हावा यासाठी शिवसेनेने स्थापनेपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा आंदोलनात ६९ शिवसैनिकानीं बलिदान दिलेलं आहे. याच आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह प्रमुख नेत्यांना तुरुंगवास झाला होता.

१६) महाराष्ट्रातील शहरांना इथल्या संस्कृतीनुसार नावं देण्याचा आग्रह शिवसेनेचाच. “बॉम्बे”च “मुंबई” शिवसेनेनेच केलं तर इतर शहरांचं नामकरण करण्यास  शिवसेना आग्रही आहे.

१७) महापालिका रुग्णालयात अद्ययावत रक्त तपासणी केंद्र उभारणारी मुंबई महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका ठरली असून तिथे सत्ता शिवसेनेकडेच आहे.

१८) २००५ साली मुंबईत अतिप्रचंड पावसामुळे जलप्रलय आला आणि मुंबई विस्कळीत झाली. यामागची कारणं लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने मुंबईत “पम्पिंग स्टेशन्स” उभारली आहेत. याद्वारे प्रत्येक मिनिटाला लाखो लिटर पाणी बाहेर फेकलं जातं. त्यामुळेच मुंबईत पुन्हा २००५ सारखी स्थिती ओढवली नाही.

१९) मुंबईतील महापालिका शाळांमध्ये “व्हर्च्युअल क्लासरूम” सुरु करून शाळांना डिजिटल  करण्याची संकल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आहे.

२०) मुंबई महानगरपालिकेची पाणी पुरवठा व्यवस्था आशिया खंडातील एकमेवाद्वितीय आहे.

२१) मुंबई महानगरपालिका ही स्वतःचं धरणं बांधणारी देशातील एकमेव महानगरपालिका असून हा प्रकल्प जगातील सर्वात वेगाने पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे.

२२) देशातील पहिलं “इंजिनियरिंग हब” उभं करण्याचा मान मुंबई महानगरपालिकेला मिळाला आहे.

२३) स्वतःच मेडिकल कॉलेज असलेली मुंबई महानगरपालिका ही एकमेव पालिका आहे.

२४) महापालिका शाळेतील १८ हजार विद्यार्थ्यांना टॅब वाटप करून त्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याची संकल्पना शिवसेनेचीच.

२५) मोडकसागर धरणात “लेक टॅपिंग” करणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेवं पालिका आहे.

२६) आशिया खंडातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने भांडुपमध्ये उभारला आहे.

२७) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिका नरिमन पॉईंट ते दहिसर “कोस्टल रोड” साकारत आहे. यामुळे हे अंतर दीड तासाऐवजी केवळ २० मिनिटात पार होईल. विशेष म्हणजे हा रोड “टोल फ्री” असेल.

२८) मुंबईतील मोठ्या बिल्डिंग लक्षात घेऊन मुंबईतील अग्निशमन दलाकडे मुंबई महापालिकेने ९० मीटर उंचीची शिडी सज्ज ठेवली आहे. इतक्या उंचीची शिडी असलेली मुंबई महानगरपालिका एकमेव महापालिका आहे.

राष्ट्रवादीचे वजनदार नेते रामराजे निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर ?

२९) महिलांना अग्निशमन दलात “फायर वुमन” म्हणून महिलांना समाविष्ट करून घेणारी मुंबई ही देशातील एकमेव पालिका आहे.

३०) शिवसेनेच्या “शिव विद्याप्रबोधिनी” द्वारे चालवल्या जाणाऱ्या “बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमी” तर्फे विद्यार्थ्यांना मोफत MPSC-UPSC स्पर्धा परीक्षांचे धडे दिले जातात.

३१) शिवसेना-युवासेनेच्या माध्यमातून YS-CET ही सराव परीक्षा NEET, MH-CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत घेतली जाते आणि परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांच्या स्पष्टीकरणासह व्हिडीओ सिरीजद्वारे उपलब्ध करून दिली जातात.

३२) महिलांवर होणारे अत्याचार हा सध्याचा एक अत्यंत ज्वलंत विषय. शाळा-महाविद्यालयांतील युवतींसाठी मोफत आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचे कार्य शिवसेनेच्या युवासेनेमार्फत केले जाते.

३३) मुंबईकरांना धकाधकीच्या जीवनात व्यायामाला विशेष वेळ देता येत नाही हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी शहरांत ठिकठिकाणी मोफत “ओपन जिम” उभारण्याची संकल्पना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची आहे.

३४) प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी राबवण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून युती सरकारने घेतला आहे.

३५) अयोध्येत राममंदिर व्हावे यासाठी शिवसेना सर्वाधिक आग्रही आहे. या प्रश्नावर महाराष्ट्रातून अयोध्येत जाऊन आवाज उठवणारा शिवसेना हा एकमेवं पक्ष आहे.

३६) शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती मिळावी यासाठी शिवसेना कायम आग्रही आहे. महाराष्ट्रात दोन वेळा अंशतः कर्जमाफी झाली ती केवळ शिवसेनेच्या आंदोलन आणि आक्रमक भूमिकेमुळेच झाली. तरीही संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेना सत्तेत असो वा नसो शेतकऱ्यांच्या पाठीशी आजही ठाम उभी आहे.

३७) शिवसेनेच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकारने “शिव आरोग्य सेवा” सुरु करून पूवीपेक्षा गतिमान आरोग्य सेवा पुरवली जात आहे. अतिदुर्गम भागातील लोकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवणे हे या सेवेचे उद्दिष्ट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गम भागातील रुग्णांची तपासणी या सेवेद्वारे केली जाते.

३८) नाणार सारखे विनाशकारी प्रकल्प होऊ नयेत यासाठी शिवसेना सदैव प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभी राहिली आहे. नाणार प्रकल्प कोकणाबाहेर जाण्यासाठी शिवसेनेने केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत.

३९) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

४०) शिवसेनेने राज्य सरकारच्या माध्यमातून “शिवशाही” आणि “विठाई” अशा बससेवा सुरु करत एसटी सेवा अधिक उत्तम करण्यात आली.

४१) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना ऑटो रिक्षाचे परवाने देण्याचा निर्णय शिवसेनेने राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला.

४२) राज्यातील नवीन रिक्षा परवान्यांच्या लॉटरीमध्ये ५% महिलांना आरक्षण देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शिवसेनेने परिवहन खात्याच्या मार्फत केले.

४३) राज्यातील एसटी स्थानकांवरील उपाहारगृहं महिला बचतगटांना चालवण्यास देऊन महिला सक्षमीकरणास चालना देण्याचे काम शिवसेनेने राज्य सरकारच्या माध्यमातून केले.

४४) जीएसटी करप्रणालीतील त्रुटींमुळे मुंबईसारख्या महापालिकांच्या उत्पन्नावर होणारा परिणाम लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सुचवलेले बदल केंद्र सरकारने स्वीकारले आणि त्यामुळे महापालिकांना होणारा आर्थिक तोटा टळला.

४५)  शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागात स्वखर्चातून शिवजलक्रांती योजना राबवून पाणी साठवण्याचे काम केले. यामुळे गेली अनेक वर्षे कोरडे पडलेले मराठवाड्यातील जलसाठे पाण्याने भरून गेले.

४६) शिवसेनेच्या शिवप्रकाश योजनेमुळे जिथे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वीज पोहोचली नव्हती अशा अनेक गावात वीज पोहोचली.

४७) शिवसेनेने “शिव वडापाव” च्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि कमी पैशात सामान्यांची भूक भागवणं असा दुहेरी हेतू साध्य केला.

४८) शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील ५०० स्क्वेअर फुटांपर्यंतची घरं करमुक्त केली. आगामी काळात ही मर्यादा ७०० फुटांपर्यंत घेऊन जाण्याची शिवसेनेची योजना आहे.

४९) शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांसाठी बँकिंग, रेल्वे इत्यादी स्पर्धा परीक्षांचे मोफत क्लासेस शिवसेना भवन येथे घेतले जातात.

५०) शिवसेना भवन येथे शिवसेनेने वैद्यकीय मदतीसाठी कक्ष उभारला असून त्याद्वारे महाराष्ट्रातील गरजूंना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे कार्य केले जाते जेणेकरून रुग्णांना महागडे उपचार तर घेता येतील पण त्यांना आर्थिक झळ सुद्धा बसणार नाही.

५१) शिवसेनेने ठाणे महानगपालिकेच्या माध्यमातून ५० ठिकाणी “बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” नावाने मोफत रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात रुग्णांना घराजवळ उत्तम उपचार आणि ब्लड, शुगर, ईसीजी अशा चाचण्या मोफत उपलब्ध होतील.

५२) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलेल्या जाहीर मागणीनुसार महाराष्ट्रातील गडकिल्ले केंद्र सरकारच्या अख्तयारीतून राज्य सरकारच्या अख्तयारीत आणली गेली जेणेकरून गड किल्ल्यांचे संवर्धन करणे सोपे होईल.

५३) ठाण्यासारख्या शहरात क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणून हजारो लोकांची घरं वाचवण्याचं काम शिवसेनेने केलं आणि सामान्य जनतेच्या डोक्यावरील छत्र वाचवलं.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here