Skip to content Skip to footer

सांगलीत काँग्रेस पक्षात बंडखोरी, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू भरणार अर्ज

रविवारचा दिवस महाराष्ट्रात सभेचा दिवस म्हणून गाजला होता. राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीची सभा कराड येथे पार पडली तर महायुतीची सभा कोल्हापूर नगरीत पार पडली परंतु काल काँग्रेस पक्षाला मोठा धक्का लागलेला आहे. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला राम-राम ठोकला आहे. या पुढे आमचे आणि काँग्रेसचे काही नाते राहणार नाही आहे आता काँग्रेसला स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घराण्याची गरज संपलेली आहे असे प्रतीक पाटील यांनी बोलून सुद्धा दाखविले आहे. त्यातच प्रतीक पाटील यांचे लहान बंधू विशाल पाटील हे सांगली जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

राजू शेट्टी यांनी आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर सांगली स्वाभिमानीला मिळावी अशी मागणी शेट्टी यांनी केली होती. त्यामुळे ही जागा त्यांच्यासाठी सोडण्याचा काँग्रेसचा विचार आहे. या जागेवरचा हक्क गेल्याने नाराज झालेल्या प्रतिक पाटील यांनी सरळ काँग्रेसलाच सोडचिठ्ठी दिली देण्याची घोषणा केली. विशाल हा काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज दाखल करेल, पक्षाने त्यांची उमेदवारी अंतिम करायची की नाही हे ठरवावे असे प्रतिक पाटील यांनी म्हटले आहे. सांगलीत वसंतदादा घराण्याची ताकद असताना ही जागा दुसरीकडे का गेली असा सवालही त्यांनी केला.

ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडल्यानंतर सांगली शहर काँग्रेस कार्यालयाला प्रतीक पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी टाळा मारून आपला राग व्यक्त केलेला होता. सांगली जिल्हा हा वसंतदादा पाटील यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु आज स्वाभिमानी संघटनेला जागा सोडून काँग्रेस पक्षाने आपल्याच कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. असे मत प्रतीक पाटील यांनी बोलून सुद्धा दाखविले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या पुढे अडचणीत वाढ निर्माण झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सांगलीची जागा प्रतिक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांना सोडणार की, स्वाभीमानी ही जागा लाडवणार हे येणाऱ्या दिवसात समोर येईल.

Leave a comment

0.0/5