Skip to content Skip to footer

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

शिवसेना-भाजपा युतीची पहिली जाहीर सभा कोल्हापूर येथे तपोवन मैदानात पार पडणार आहे. या सभेसाठी कोल्हापूरचे सर्व शिवसेना आमदार, भाजपा पक्षाचे आमदार आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते चार-पाच दिवसा पासून सभेच्या कामाला लागलेले आहे. ही महायुतीची पाहिली सभा “न भूतो न भविष्यती” अश्या मोठ्या जनसंख्येने होणार आहे असे राज्याचे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री चद्रकांतदादा पाटील यांनी बोलून सुद्धा दाखविले होते.

आज सायंकाळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबाबाईचे दर्शन घेतलेले आहे. या वेळी त्यांच्या बरोबर कोल्हापूर जिल्ह्यचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, कोल्हापूरचे शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकलंगलेचे उमेदवार ध्येयाशिल माने हे सुद्धा उपस्थित होते. कोल्हापुरात होणाऱ्या शिवसेनेच्या पहिल्या सभेला थोडे महत्वचं असते असे जुने शिवसेना कार्यकर्ते आज सुद्धा बोलून दाखवितात. तेथून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन तपोवन या सभा मंडपाकडे मार्गस्थ झालेले आहे.

Leave a comment

0.0/5