Skip to content Skip to footer

प्रचार सुरु; पण वेळेचे काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वक्तशीरपणाबद्दल ख्याती आहे. आजोबा आणि वडिलांचा हा गुण आत्मसात करणे पार्थ यांना मात्र जमलेले नाही. निवडणूक प्रचारात बहुतांश ठिकाणी पार्थ नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचत असल्याने प्रचारात असणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची चिडचिड होत आहे .ज्या पद्धतीने, पार्थ यांचे दैनंदिन कार्यक्रमाचे नियोजन तयार केले जाते, त्यानुसार वेळा निश्चित केल्या जातात. प्रत्यक्षात त्याचे पालन होत नाही. त्यामुळे सगळाच गोंधळ उडत आहे. पार्थचे दौरे कळवले जात नाहीत. कार्यक्रम अचानक बदलले जातात. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडते.

Leave a comment

0.0/5