Skip to content Skip to footer

खासदार राहुल शेवाळे यांचा नागरीकांशी संवाद

दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा यांच्यावर विश्वास ठेऊन दक्षिण मध्य मुंबईतून खासदारकीची उमेदवारी जाहीर केली आहे. काही दिवसापूर्वी आपल्या कामाचा जाहीरनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे प्रकाशित केला होता. तसेच जनतेची अति जलद गतीने कामे सोडवणाऱ्या त्यांच्या चेंबूर येथील कार्यलायाला आय.एस.ओ प्रमाण पत्र बहाल करण्यात आलेले होते. आज खासदार श्रीरंग बारणे यांच्या नंतर खासदार राहुल शेवाळे यांना संसदरत्न या पुरस्काराने सम्मानित करण्यात आलेले आहे.

आज शेवाळे यांचे नाव शिवसेना यादीत जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा शेवाळे यांनी केलेल्या जनतेच्या कामाची पोचपावती त्यांना उमेदवारी जाहीर करून देण्यात आलेली आहे असेच समजते. दक्षिण मध्य मुंबई मध्ये मुंबईतील अनेक महत्वाची ठिकाणे या विभागात मोडतात त्यामुळे या भागाला मुंबईत वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे. काही दिवसापूर्वी रिपाई नेते रामदास आठवले यांच्या घरी जाऊन खा. राहुल शेवाळे यांनी भेट सुद्धा घेतलेली होती. आज विभागातील जनतेच्या गाठीभेटी, वरिष्ठांचे सल्ले सध्या राहुल शेवाळे भेटी मार्फत घेत आहे. आज संसदरत्न पुरस्कार भेटल्यामुळे त्यांच्या बरोबर विभागातील जनतेची मान सुद्धा अभिमानाने उंचावलेली आहे.

एक सामान्य शिवसेना कार्यकर्ता, नगरसेवक आणि शिवसेना खासदार हीच त्यांच्या कामाची पोच पावती आहे असेच आज वरिष्ठ नेते मंडळी बोलून दाखवत आहे. आज धारावीचा प्रकल्प असू दे किंवा बीडीडी चाळीचा प्रकल्प आज शासन दरबारी सतत पाठपुरवठा करून मार्गी लावण्याचे काम खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे. आज मुंबईतील तरुण खासदार म्हणून सुद्धा त्यांच्या कडे पहिले जात आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला तेच दक्षिण मध्य मुंबईतून निवडणून येतील.

Leave a comment

0.0/5