Skip to content Skip to footer

काँग्रेस राष्ट्रवादीला चोर म्हणणारे शेट्टी आता चोरांच्या टोळीचे भागीदार झाले आहेत- सदाभाऊ खोत

काँग्रेस राष्ट्रवादीला चोर म्हणणारे शेट्टी आता चोरांच्या टोळीचे भागीदार झाले आहेत. अशी खोचक टीका कधीकाळी राजू शेट्टी यांचे खन्दे समर्थक मानले जाणारे मंत्री सदाभाऊ खोत यांनी आरोप केले आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते लोकसभेच्या निवडणुकीला एकमेकांन समोर आलेले आहे. सदाभाऊ खोत हे भाजपा खासदार संजय पाटील यांचा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी सांगली जिल्यात आलेले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. तसेच सदाभाऊ खोत यांच्यावर शेट्टी उभे असलेल्या हातकणंगले मतदार संघातील शिवसेना उमेदवार ध्येयाशिल माने यांच्या प्रचाराची जबाबदारी खुद्द उद्धव ठाकरे यांनी सोपवलेली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जन्म हा मुळातच त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात झालेला होता. शेट्टी यांनी या दोन्ही सरकारच्या विरोधात अनेक उपोषणे तसेच मोर्चे काढलेले होते आणि याचा शेतकऱयांच्या बळावर खासदार म्हणून केंद्रात निवडून सुद्धा गेलेले होते. परंतु आता त्याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील होऊन शेतकऱयांचा विश्वासघात केला आहे असेच आज बोलले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘आली बाबा चाळीस चोर’ असे म्हणणारे स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आता चोरांच्या टोळीचे भागीदार बनले आहेत, अशी टीका खोत यांनी केली. वर्षानुवर्षे काटा मारणाऱ्या कारखानदारांविरोधात लढाई करणारे शेतकऱ्यांचे नेते मग, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पंगतीला बसून काटा मारण्याचा हिस्सा मागायला गेलेत का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

खोत म्हणाले, शेट्टींनी खासदार फंडातून वजन काटे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पाच वर्षाचा कालावधी संपला तरी वजन काटे बसवण्यात आले नाहीत. उसाचा काटा मारणाऱ्या विरोध लढाई करणारे शेट्टी आता कारखानदारांनी मारलेल्या काट्याचा हिस्सा मागायला गेले आहेत. हे आता हातकणंगले येथील जनतेलाही समजलेले आहे. असे सुद्धा मंत्री खोत यांनी बोलून दाखविले होते. आज शेतकऱयांचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या मांडीला मंडी लावून बस्तान शेट्टी यांना लाज कशी वाटत नाही असे सुद्धा खोत यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5