Skip to content Skip to footer

शेकापच्या ओंजळणीने पाणी पिण्यास काँग्रेसचा नकार, पार्थ यांच्या पुढे अडचणीत वाढ

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेस राष्ट्र्वादीने मावळ मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांचे नाव जाहीर केले आहे. तसेच तेथील स्थानिक पक्ष शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु या शेकापच्या पाठिब्याला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे मावळ मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दगाबाज शेकापच्या ओंजळीने आम्ही पाणी पिणार नाही अशी स्पष्ट भूमिका पनवेल, उरण काँग्रेसने घेतल्याने उरण, पनवेल, खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे तारू प्रचाराच्या रणधुमाळीआधीच भरकटू लागले आहे.

अलिबाग, पेण आणि उरणच्या काही भागापुरता शिल्लक राहिलेला शेतकरी कामगार पक्ष नेहमीच स्वार्थी राजकारणासाठी ओळखला जातो. एकेकाळी राष्ट्रवादीविरोधात उघडपणे बंड करणारे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी आता थेट पार्थ पवार यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र रायगड जिह्यात काँग्रेस-शेकापमध्ये साप आणि मुंगसाचे नाते असल्याने पनवेल व उरणमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी उघडपणे बंड करण्यास सुरुवात केली आहे. शेकापने कधीही आपल्या स्वार्थाचा विचार केला आहे असेच मत तेथील स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

दगाबाज शेकापच्या ओंजळीने आम्ही पाणी पिणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आधीच टेन्शनमध्ये असलेल्या राष्ट्रवादीची या नव्या लोच्यामुळे डोकेदुखी वाढली असून काँग्रेसची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. परंतु मागच्या अनेक निवडणुकीत शेकापा आणि काँग्रेस पक्षाचा छत्तीसचा आकडा राहिलेला आहे. त्यामुळे शेकाप बरोअबर असेल तर काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करणार नाही अशीच भूमिका घेतलेली दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5