भाजपा पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. काही दिवसा पासून मनसेचे राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे चांगलेच सूत जमलेले महाराष्ट्रात दिसून येत होते. राष्ट्रवादीचे नेते राज ठाकरे यांच्या पक्षाला महाआघाडीत घेण्यासाठी उस्सुक होती. परंतु येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला मनसे पक्ष लढणार नाही असे सुद्धा राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. परंतु राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली होती.
राज ठाकरे यांनी मोदींवर केलेली टीका ही महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या चांगलीच जिव्हाळी लागलेली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता बारामतीचा पोपट म्हणून उल्लेख केले होता. हे पुराण महाराष्ट्रात खूपच गाजलेलं होत. त्यातच भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुद्धा नाव न घेता राज ठाकरे यांना चिमटा काढला आहे. “सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार….एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही…जाणत्या राजाला गाठले…पाठीवर हात ठेऊन…नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले….!! “शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे” असे ट्विट आशिष शेलार यांनी केले होते.