Skip to content Skip to footer

काँग्रेसचे आमंत्रण नसताना मनसे नेते त्यांच्या प्रचारात

दादरमधील शिवाजी पार्क परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत एकनाथ गायकवाड संवाद साधण्यासाठी आले होते. हा कार्यक्रम अगोदरच जाहीर झाला होता. पण या प्रचार उपक्रमामध्ये मनसेचा सहभाग असेल याची माहिती कुणालाच नव्हती. गायकवाड यांचा प्रचार सुरू असताना त्यांच्यासोबत मनसेचे संदिप देशपांडेही सहभागी झाले. गायकवाड, देशपांडे आणि काँग्रेस – मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी मनसेला आमंत्रण नसतांनाही विना आमंत्रित पाहुणे बघून काँग्रेस कार्यकर्ते व शिवाजी पार्क भागातील नागरिकही आश्चर्यचकित झाले होते , गायकवाड शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

दक्षिण मध्य मुंबईतून संसदरत्न खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे. परंतु या जागेसाठी काँग्रेस पक्षात रस्सीखेच चालू होती. एकनाथ गायकवाड यांच्या बरोबर भालचंद्र मुगणेकर आणि उत्तम खोब्रागडे यांच्या नावाची चर्चा सुद्धा चालू होती. परंतु ही जागा गायकवाड यांना सोडण्यात आली होती. त्याचमुळे विभागातील काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये फूट पडलेली दिसून येत आहे आणि हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. आपल्या कार्यकाळात विभागात वर्षातून एकदा-दोनदा दिसणारे खासदार म्हणून एकनाथ गायकवाड यांची ओळख आहे.

आज मनसे संदीप देशपांडे हे काँग्रेस उमेदवार गायकवाड यांच्या बरोबर दिसल्यामुळे मुंबईत या विषयी उलट-सुलट चर्चा चालू झाल्या आहेत. ज्या राज ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षावर आरोप केले आज त्याच्या उमेदवारांच्या प्रचाराला मनसेचे संदीप देशपांडे दिसल्यामुळे राज ठाकरे यांनी आपली मराठी भूमिका सोडली आहे की काय असाच प्रश्न सध्या पडला आहे आणि संजय निरुपम यांचा सुद्धा मनसे प्रचारा करणार का ? असाच प्रश्न मराठी माणसाला पडलेला आहे. आज न बोलावता सुद्धा मनसे कार्यकर्ते काँग्रेसच्या पाठीमागे फिरत असताना दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला या दोहरी भूमिकेची किंमत राज ठाकरे यांना चुकवावी लागणार आहे असेच बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5