Skip to content Skip to footer

फडणवीस सांगतील त्या पक्षात जाईल काँग्रेस आमदाराची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील, त्या पक्षात जाईन, अशी घोषणा काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली आहे. तसेच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार करणार असल्याचेही आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटले आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मी कोणत्याही क्षणी काँग्रेस सोडू शकतो. सध्या मी भाजप किंवा शिवसेनेत जाण्याचे निश्चित केले नाही, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेश देतील, त्यानुसार मी पक्ष प्रवेश करेन” अशी घोषणा आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली आहे.

आमदार कालिदास कोळंबकर हे एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थेक मानले जात होते. कालांतराने राणे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी दिल्या नंतर कोळंबकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देत राणे यांच्या बरोबर काँग्रेस पक्षात सामील झाले होते. कालांतराने राणे यांचे काँग्रेस मध्ये मतभेद वाढत गेले आणि त्यांनी काँग्रेस पक्षाला राम-राम ठोकला पण कोळंबकर हे काँग्रेस पक्षात राहिले परंत्तू काही महिन्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर दिसू लागले होते या बद्दल त्यांना विचारल्यावर “माझी कामं मुख्यमंत्र्यानी केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे. फक्त नायगावमधील पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करेन, असं कालिदास कोळंबकर यांनी बोलून दाखविले होते.

कालिदास कोळंबकर हे मुंबईतील जुने आमदार म्हणून ओळखले जातात. मागील ३० ते ३५ वर्षापासून ते नायगाव-वडाळा विभागाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग या विभागात तयार झालेला आहे. त्यातच महायुतीच्या निर्णय नंतर साहजिकच त्यांना दक्षिण मध्य मुंबई विभागातील शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचाराची जबाबदारी भेटण्याचे संकेत सुद्धा देण्यात आलेले आहे. या सर्व घडामोडी मुळे येणाऱ्या काळात कालिदास कोळंबकर नायगाव-वडाळा विभागात विधानसभेला कमळ फुलवणार अशीच चर्चा सध्या जोरदार सुरु झालेली आहे. परंतु कोळंबकर यांच्या भाजपा प्रवेशाने मुंबईत भाजपाची ताकद वाढताना सुद्धा दिसणार आहे

Leave a comment

0.0/5