लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीची जाहीर सभा येणाऱ्या २६ एप्रिल रोजी मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पार पडणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी प्रचारसभांची माहिती देण्यासाठी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी महायुतीच्या सभेची माहिती दिली. ते म्हणाले, २६ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता बीकेसी मैदानावर महायुतीची विराट सभा होईल. सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही भाषणे होतील. ही सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, सुमंत घैसास व आपण स्वतः मेहनत घेत असल्याचे आशीष शेलार म्हणाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा-शिवसेना पक्षाने उमेदवार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रातभर महायुतीने सभेचा धडाकाच लावला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युतीच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी महारष्ट्रभर सभा घेताना दिसून आले आहेत. आजवर निवडणुकीच्या प्रचाराला कधीही बाहेर न पडणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा महायुतीच्या तयारीची धास्ती घेऊन आपल्या हक्काचे मतदार संघ म्हणजे माढा, बारामती, कोल्हापूर या जागा आणण्यासाठी जीवाचे रान करताना दिसत आहे. त्यामुळे बीकेसी येथे होणाऱ्या सभेची धास्तीच महाआघाडीने घेतलेला दिसून येत आहे.