चंद्रकांत खैरे यांना मराठा संघटनांचा पाठिंबा, इतर समाज सुद्धा पाठीशी आल्याने शिवसेनेचं पारडं जड

चंद्रकांत खैरे| Chandrakant-Khair-e-Mara

संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत शिवसेना चंद्रकांत खैरे यांना अनेक मराठा संघटनांनी जाहीर पाठिंबा घोषित केल्याने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा फायदा होणार आहे.येत्या २३ तारखेला संभाजीनगर लोकसभेसाठी मतदान होणार असून यावेळी शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि शिवसेनेतून बाहेर पडलेले हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

 

सुरुवातीला मराठा मतांची खैरे व जाधव यांच्यात विभागणी होईल आणि त्याचा फायदा जलील यांना होईल असं म्हटलं जातं होतं. मात्र चंद्रकांत खैरे यांना अनेक मराठा संघटना तसेच ब्राह्मण, धनगर, खाटीक, लोणारी, लहुजी शक्ती सेना, राजपूत, ओबीसी एन टी संघटना या संघटनांनी पाठिंबा दिल्याने खैरेंच पारडं जड झाल्याचं चित्र पुन्हा निर्माण झालं आहे.नेहमीप्रमाणे चंद्रकांत खैरे यांना हिंदू समाज आपल्याकडे ठेवण्यात यश आल्याने यंदाची लढत सुद्धा खैरेच जिंकतील असा अंदाज बांधला जात आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here