Skip to content Skip to footer

मावळ, बारामतीत राष्ट्रवादीचा पराभव निश्चित – विजयसिंह मोहिते-पाटील

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार करताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोहिते- पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला आज मतदानाच्यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. पवारांच्या टीकेला मतदारच चोख उत्तर देतील. केवळ माढ्यातच नव्हे तर मावळ आणि बारामतीमध्ये देखील राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागेल, असा विश्वास मोहिते-पाटील यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील १४ जागांसाठी आज सर्वत्र मतदान होत आहे.

शरद पवार यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने घराणेशाहीचा उत आणला आहे, आधी उमेदवारी जाहीर करून पुन्हा पराभव दिसल्याने पवार यांनी माघार घेतली, आता त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती लोकसभेत जाणार नाही, अशी परिस्थिती असल्याचं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी मावळ, बारामती आणि माढा मतदारसंघाट सुद्धा राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागेल असे सुद्धा मोहिते-पाटील यांना बोलून दाखविले होते. त्यामुळे थोड्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा एकदा फटका बसणार असे सुद्धा पाटील यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5