Skip to content Skip to footer

मनसेचा खोटारडेपणा उघड सभेला हजेरी लावणारा व्यक्ती निघाला मनसे पक्षाचा कार्यकर्ता

काल राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत एका मध्यमवर्गीय कुटुंबाला मंचावर बोलावले आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांनी दावा केला कि, या कुटुंबाने त्यांचा स्वतःचा कौटुंबिक फोटो, फेसबुक का कुठेतरी त्यांचा त्यांचाच टाकला. तो उचलला आणि त्याच्यावर मोदींचा फोटो छापून बाहेर स्प्रेड करताहेत. यांच्या लावारीस कार्ट्यांना लाजही वाटत नाही, आपण कुणाचे फोटो उचलतोय, कुणाच्या जाहिराती करतोय, काही माहिती नाही. ही आख्खी पाच वर्षे अशीच वाया घालवली असे आरोप राज ठाकरे यांनी भाजपा आयटी सेलवर लावले होते मात्र मनसेने लावलेले आरोप खरंच सत्य आहे का?\

राज ठाकरे यांनी काळाचौकी येथे घेतलेल्या सभेला भाजपाची पोलखोल करण्यासाठी ज्या परिवाराला स्टेजवर बोलावले होते. त्या परिवाराचा सदस्य हा मनसे पक्षाचा कार्यकर्ता निघाला आहे. ज्या व्यक्तीला स्टेजवर बोलावून भाजपचे पितळ उघडे पाडले तो योगेश चिले हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय कार्यकर्ता निघाला आहे. त्यामुळे राज ठाकरे भाजपा पक्षाची पोलखोल करत असताना स्वतः ची प्रतिमा महाराष्ट्रातील जनतेच्या नजरतेत पाडून घेताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांना फटका बसणार हे सुद्धा नाकारता येणार नाही आहे.

यावर येत्या २७ तारखेला भाजप ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मनसेची पोलखोल करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. या सभेमध्ये भाजपा सर्व व्हिडिओ लोकांसमोर आणून राज यांचे आरोप खोडून काढणार असल्याची माहिती तावडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे भाजप आता कोणते व्हिडिओ लोकांसमोर आणणार याची उत्सुकता मनसेला असणार आहे. परंतु इतर पक्षाच्या उमेदवारांना मदत होईल अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडून कुठेतरी आपलय राजकीय कारकीर्तीला डाक्का पोहचवण्याचे काम करत असताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5