ग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या रोड शोमध्ये बुधवारी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. रॅलीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅलीत दिग्विजय सिंह यांच्यासोबत कॉम्प्युटर बाबा देखील उपस्थित होते. मध्य प्रदेशातील भोपाळची जागा सध्या खूपच चर्चेत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून दिग्विजय सिंह निवडणूक लढवत आहेत, तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे
दिग्विजय सिंह यांच्या रोड शोमध्ये गोंधळ होण्याची शक्यता असल्याने येथे साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तैनात करण्यात आलेल्या सर्व पोलिसांनी भगवे पंचे परिधान केले होते. याबाबत त्यांना विचारले असता रोड शोदरम्यान त्यांना असे भगवे पंचे घालण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या रोड शोचे नेतृत्व कॉम्प्युटरबाबांनी केले होते. यामध्ये अनेक साधूदेखील सहभागी झाले होते.