Skip to content Skip to footer

पाकिस्तानला जाणारे पाणी रोखणार – नितीन गडकरी…..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवादावरून फटकारले. पाकिस्तानने दहशतवाद न थोपवल्यास तिकडे जाणारे पाणी वळवले जाईल, असा इशारा गडकरी यांनी दिला. १९६० मध्ये तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानच्या जनरल अयूब खान यांच्यामध्ये उभय देशांसाठी पाणीवाटप करार झाला होता. त्यावेळी झालेल्या लिखीत करारामध्ये दोन्ही उभय देशांमध्ये बंधुत्व, सौहार्द आणि कौटुंबिक नाते असल्याने आम्ही भारतातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पाकिस्तानला देत आहोत असे नमूद करण्यात आले होते.

पाकिस्तानकडून दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांचे समर्थन केले जात आहे. त्यामुळे त्यांनी दहशतवादाला पायबंद न घातल्यास आमच्याकडे पाकिस्तानला जाणारे पाणी रोखल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशाराच गडकरी यांनी पंजाबमध्ये प्रचारासाठी आले असताना पाकिस्तानला दिला.

पाकिस्तानला जाणारे पाणी वळवून ते पंजाब, हरियाणा, आणि राजस्थानला दिले जाईल, असे गडकरी म्हणाले. कर्तारपूर कॉरिडॉरचे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जमीन अधिग्रहण करताना अडचणींना सामोरे जावे लागले, पण पंजाब सरकारच्या मदतीने त्यावर तोडगा काढला जाईल असे गडकरी यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5