Skip to content Skip to footer

वंचितची एकही जागा येणार नाही – आठवले

लोकसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढविलेल्या वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रातून एकही उमेदवार निवडून येणार नाही, असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत
केले.

रविवारी ना. आठवले हे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ना. आठवले यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीवर खोचक टीका केली. खा. शरद पवार यांच्या ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड आहे या वक्‍तव्याचीही आपल्या शैलीमध्ये खिल्ली उडवली.

यावेळी बोलताना ना. आठवले म्हणाले, राष्ट्रवादी-काँग्रेस आणि सेना-भाजप या दोन आघाड्या वगळता तिसर्‍या आघाडीला मतदान करण्याची मानसिकता मतदारांची नाही. त्यामुळे तिसरी आघाडी सत्तेत येईल, हे म्हणणे चुकीचे आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. यापूर्वी 1996 ला आम्ही अशीच तिसरी आघाडी केली होती. त्यावेळी लोकसभेच्या 11 जागा लढविल्या होत्या. परंतु एकही जागा निवडून आली नाही. आमच्या उमेदवारांना 1 ते 2 लाखांपर्यंत मते मिळाली. परंतु निवडून येण्यासाठी चार ते साडेचार लाख मते मिळावी लागतात. तेवढी मते आम्हाला मिळू शकत नाहीत. त्यामुळे सत्तेत यायचे असेल तर प्रस्थापित आघाड्यांसोबतच युती करावी लागणार असल्याचेही ना. आठवले यांनी सांगितले

Leave a comment

0.0/5