Skip to content Skip to footer

राज ठाकरेसाठी केंद्रातील काँग्रेस नेत्यांची चर्चा…..

लोकसभेच्या रिंगणात एकही उमेदवार नसतानाही झंझावाती प्रचारसभांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला हादरून सोडलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे`यांच्यासाठी काँग्रेसकडून हालचाली सुरू झाल्याचे समजते. येत्या २३ मे रोजी राज यांच्या सभांनी किती फरक पडला याचा आढावा घेऊन राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीत चर्चा करणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. राज यांनी लोकसभेला एकही उमेदवार दिल नव्हता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीला राजकीय क्षितीजावरून कायमचे हद्दपार करा, असे प्रत्येक सभेत सांगत त्यांनी राज्यातील प्रचारामध्ये जाण फुंकली होती. त्यांच्या राज्यभर झालेल्या सभा संपूर्ण देशात चर्चेच्या विषय ठरल्या. राज यांनी आगामी विधानसभा निवडणुकींसाठी लोकसभेतून रणशिंग फुंकले आहे.

राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत फायदा तर नक्कीच होणार आहे, फक्त तो नक्की किती झाला हे पाहावे लागेल, अशी बोलकी प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली. राज्यात विरोधी पक्षांनी सभा गाजवेल असा तोडीचा नेता एकही नसल्याने राज यांनी लोकसभेत ती पोकळी भरून काढली. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांनी राज यांच्या सभा आपल्या भागात लागण्यासाठी चांगलीच कंबर कसली होती. राज यांची उत्तर भारतीयां विरोधात भूमिका पाहून काँग्रेसमध्ये दुफळी आहे. त्यामुळे राज यांना आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या गोटात सामील करून घेतल्यास राज यांचा कल सर्वांधिक मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांवर असेल. त्यामुळे उत्तर भारतीय हा कळीचा मुद्दा असेल. त्यामुळे काँग्रेसकडून कोणती पावले उचलली जातील हे पाहणे उस्सुक्तेचे असेल.

Leave a comment

0.0/5