सावरकरांचा इतिहास गेहलोत सरकारने पाठयपुस्तकातून वागळला….

सावरकर |Savarkar's history-Gehlot

एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या भाषणात वीर दामोदर सावरकर यांच्यावर सतत टीका करत असताना दिसतात तर दुसरीकडे काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान मध्ये वीर सावरकर यांचा इतिहास जाणूनबुजून पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आलेला आहे. एका बाजूला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आम्ही कुणाचाही द्वेष करत नाही अस म्हणत असले तरीही कॉंग्रेस पक्ष कसे द्वेषाचे राजकारण करतो याचा प्रत्यय राजस्थान मध्ये आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय खालच्या भाषेत टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्या कॉंग्रेसने राजस्थानात सावरकरांचा अपमान करण्यासाठी चक्क सावरकरांच्या धड्याला पाठ्यपुस्तकातून वगळण्याचे काम केले आहे.

फक्त गांधी-नेहरुचं नव्हे तर देशासाठी योगदान दिलेल्या सर्वांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. मात्र राजस्थानात भाजपा सरकारच्या काळात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धड्याला सत्तेची मस्ती आलेल्या कॉंग्रेसच्या गेहलोत सरकारने कात्री लावण्याचा अजब पराक्रम केला आहे. कॉंग्रेसच्या या कृत्यामुळे संपूर्ण राजस्थानात संतापाची लाट उसळली आहे. राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की ‘वीर सावरकरांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनात कोणतंच योगदान नसल्याचं निर्लज्जपणे सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here