भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचारा दरम्यान पश्चिम बंगाल मधील उसळलेल्या हिंसे नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सभा घेणार आहे. बंगालच्या हसनाबाद आणि डायमंड हार्बर या दोन ठिकाणी नरेंद्र मोदी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. लोकसभा निवडणुकी दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. अमित शहा यांच्या रॅलीतही मोठा हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले होते. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या बंगाल मध्ये होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अमित शहा यांच्या प्रचार रैली दरम्यान भाजपा कार्यकर्ते आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कार्यकर्त्यां मध्ये हाणामारी झाली होती
.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या वाहनावर रोड शोदरम्यान हल्ला झाला. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकदेखील करण्यात आली. ‘आमच्या रॅलीत मोठ्या प्रमाणात लोकं सहभागी झाले होते, त्यामुळे तृणमूलचे कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला. बंगालच्या जनतेनं ही गुंडगिरी वेळीच रोखलं पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया या गदारोळानंतर अमित शहा यांनी दिली आहे. कोलकात्यातील रक्तरंजित राड्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नंतर घटनास्थळाला भेट परिस्थितीचा आढावा घेतला होता.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपने यंदा पश्चिम बंगालमध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. अमित शहा हे सातत्याने बंगालमध्ये तळ ठोकून आहेत. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठण्यासाठी यावेळी भाजपला बंगालमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्षानं टोक गाठलं आहे. त्यातून हिंसाचाराचेही अनेक प्रकार घडले आहेत. पश्चिम बंगाल लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने देशातलं तिसरं मोठं राज्य आहे. लोकसभेच्या ४२ जागा इथे आहेत. उत्तर प्रदेशात ८० जागा तर महाराष्ट्रात ४८ लोकसभा सीट्स आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा नंबर येतो.