२०१९ च्या निवडणुकीला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाला अनपेक्षित यश मिळाले आहे. संपूर्ण देशाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन देशाची सूत्र त्यांच्या हातात सोपवलेली आहे. आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला देश-विदेशातील मान्यवरांना, राजकर्त्यांना तसेच देशातील उद्योगपती, सिने अभिनेता यांना सुद्धा शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आलेले आहे. २०१४ च्या दिमाखदार सोहळ्या सारखा हा शपथविधी सोहळा अगदी दिमागदार होणार याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.
मोदींच्या शपथविधी सोहळयाचे शिवसेना मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून ही सारी ईश्वरी योजना असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी उडवलेली टीकेची झोड, पश्चिम बंगाल मध्ये झालेला हिंसाचार यांचा सुद्धा खरपूस समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेण्यात आलेला आहे. ममता बॅनर्जी यांचे आणि मोदींचे राजकीय समीकरण नेमकं कसे आहे, हे सांगत बदलेल्या परिस्थितीचा थो़क्यात आढावा अग्रलेखात देण्यात आला.
पाकिस्तानशी देशाचे असणारे एकंदर समीकरण पाहता २०१४ मध्ये मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवाज शरीफ यांची उपस्थिती होती. पण, यंदा मात्र हा विषप्रयोग नको असे म्हणत देशभावनेच्या विरोधाच जाण्याचा मोदीचा मनसुबा नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. शिवसेनेच्या या मुखपत्रातील अग्रलेख हा नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची ग्वाही देत आहे, असे म्हणायला हरकत नाही. अग्रलेखातील उल्लेख आणि मोदींचं वर्णन करताना वापरण्यात आलेली विशेषण ही विशेष लक्षवेधी ठरत आहेत.