Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर ?

लोकसभा निवडणुकीच्या यशा नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला उतरती कळा लागली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला फक्त ६ जागेवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस पक्षाला फक्त १ जागा मिळलेली आहे. त्यातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक बडे नेते आपल्या पक्षांना सोडचिट्टी देत भाजपा-शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वीच मराठवाड्यतील वजनदार नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्र्वादीतील अंतर्गत वादाला कंटाळून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.

त्यातच आता अजून एक नाव समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बडे प्रस्थ आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सोशल मिडीयावर जोरात सुरु आहे. दिलीप सोपल यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असणार आहे. युतीच्या जागा वाटपात बर्शीची जागा ही सेनेकडे असून विधानसभेसाठी भाजपला ही जागा सुटेल, अशी आस लावून बसलेल्या राऊत यांच्या स्वप्नांना सोपल यांच्या सेनाप्रवेशामुळे सुरंग लागू शकतो. एका दगडात दोन शिकारी करण्यासाठी प्रसिद्ध असणारे दिलीप सोपल पुन्हा एकदा राऊत यांना चीतपट करतानाचं सत्तधारी पक्षाचा घटक बनू शकतात, अशी चर्चा बार्शी तालुक्यात रंगत आहे

Leave a comment

0.0/5