Skip to content Skip to footer

संग्राम जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्याने थोपटले दंड.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी नगर शहरातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना डावलून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. ‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशस्तरीय नेत्यांकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हंटले. किरण काळे हे ‘राष्ट्रवादी’च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यात सक्रिय आहेत त्यामुळे त्यांचा पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर संपर्क आहे. आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली.

नगर शहराचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी टीका केली आहे तसेच त्यांच्याविरोधात जनआंदोलनही सुरू केले आहे. इतकेच नव्हे तर, नगर शहरातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाकडे शहरातून लढण्याची परवानगी मागितली होती. त्या वेळी जगताप समर्थक व काळे समर्थकांमध्ये वादही झाले होते. मात्र त्यावेळी काळें ऐवजी जगतापांना उमेदवारी देण्यात आली होती.

किरण काळे यांनी पुन्हा शहरातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. तशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर, ३० वर्षांपासून शहर विकासापासून वंचित आहे, शहरात गुंडाराज असून, बेरोजगार तरुण पिढीला आयुष्य उद्ध्वस्त करणारा गुन्हेगारी स्वरूपाचा रोजगार देण्यात काही नेत्यांना धन्यता वाटते. अशा प्रवृत्तीमुळे नगरची राज्यभर बदनामी झाली आहे. असा टोलाही त्यांनी संग्राम जगताप यांचे नाव न घेता लगावला आहे.

Leave a comment

0.0/5