Skip to content Skip to footer

-अन् बॉडी शेमिंगवर बोलता बोलता विद्या बालन अचानक लागली रडू…!

विद्या बालनच्या शरीरावरचे, वाढलेल्या वजनावरचे जोक्स अनेकांसाठी नवे नाहीत. ती कायम बॉडी शेमिंगची शिकार ठरली. अर्थात विद्याने स्वत:वरचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. पण अलीकडे बॉडी शेमिंगवर बोलता बोलता विद्या अचानक भावूक झाली आणि रडायला लागली.

विद्याचा  एक बॉडी शेमिंगवरचा व्हिडिओ  व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओत विद्या  अनेक बॉलिवूड गाण्यांच्या माध्यमातून बॉडी शेमिंगवर बोलताना दिसतेय. सध्या विद्या  बिग एफएम रेडिओवर एक  शो करत आहे. याच बिग एफएमच्या युट्यूब चॅनलवर ‘ लेट्स टॉक अबाउट बॉडी शेमिंग’   नावाचा एक व्हिडिओ शेअर केला गेलाय. ‘ कभी तू मोटी कहता है, कभी तू छोटी कहता है, कभी तू काली कहता है, कभी तू सावली कहता है’, अशी गाणी म्हणताना  मध्येच विद्या रडताना दिसते.

कधी शरीराची साईज, तर कधी डोळ्यांची साईज, कधी रंग आणि अंगावर विनोद करणे फार लाजीरवाणे आहे.  तुमच्या अशा वागण्यामुळे कुणाच्या आत्मविश्वासाला किती मोठी ठेच लागू शकते, याचा तुम्हाला अंदाजही नाही. तुमचे विनोद कोणाला टोचू शकतात, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे म्हणून तर प्रत्येक व्यक्ती खास आहे, असे ती सरतेशेवटी म्हणते.

यापूर्वी अनेकदा विद्या बॉडी शेमिंगविरोधात बोलली आहे. ‘मी तरूण असताना मला अनेकजण माझ्या वजनावरून सल्ला द्यायचे. तू इतकी सुंदर आहेस. मग वजन का घटवत नाहीस, असे काय काय बोलायचे,’ असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

Leave a comment

0.0/5