Skip to content Skip to footer

शिवसेना -भाजपा युतीला २२५ जागा मिळतील – गिरीश महाजन

लोकसभा निवडणुकीला शिवसेना भाजपा पक्षाला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले आहे. आज काँग्रेस पक्षाकडे स्वतःचा विरोधी पक्ष नेता निवडण्याइतके सुद्धा संख्याबळ निवडून आलेले नाही आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा तर अमेठी मतदार संघात भाजपच्या मंत्री स्मुर्ती इराणी यांनी पराभव केलेला आहे. त्यात आता काही महिन्यावर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना-भाजपा तसेच त्यांच्या मित्र पक्षाला २२५ जागा मिळतील असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेला आहे.

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत यश मिळाले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीतील निकाल हे आणखी धक्कादायक असतील. आम्ही कोणत्याही परिस्थितीत सव्वादोनशेचा आकडा गाठू आणि पुन्हा सत्ता स्थापन करू, असा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षातील अनेक नेते हे भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. त्यांची मोठी यादी आहे. लवकरच ते स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या अनेक बाध्य नेत्यांनी महाजन त्यांच्या भेटी नंतरच भाजपा पक्षात प्रवेश केला होता.

Leave a comment

0.0/5