Skip to content Skip to footer

आधी घुसखोरांना हाकला, कोयना मित्रांची ममता दीदींवर सडकून टीका…..

ईदच्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एक भाषण ठोकल. या भाषणावरून एका अभिनेत्रीने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या भाषणात ‘त्याग का नाम है हिंदू, इमान का नाम है मुसलमान, प्यार का नाम है इसाई, सिखों का नाम है बलिदान, यह हमारा प्यारा हिंदुस्थान, इसकी रक्षा हमलोग करेंगे, जो हमसे टकराएगा चूर चूर हो जाएगा’ असे विधान केले होते. यावरून कोयना मित्रा या अभिनेत्रीने ट्विट करत ममता बॅनर्जींवर सडाडुन टीका केली आहे.

कोयना मित्रा हिने केलेल्या ट्विट मध्ये लिहले आहे की त्याग माय फूट त्याग आणि बलिदान हिंदू तसेच शीख करणार नाहीत. तुम्ही इमानच्या नावाखाली घुसखोरी करणाऱ्य़ा घुसखोरांना देशाबाहेर हाकला, हा देश त्यांचा नाही. हे ट्विट करत असताना कोयनाने ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस आणि बाबूल सुप्रियो यांना टॅग केले आहे. कोयना ही गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तिने ममता बॅनर्जी यांनी केलेल्या ट्विटवरूनही त्यांच्यावर टीका केली होती.

ममता यांनी निकालानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की ‘सगळ्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन, मात्र जे हरलेत त्यांना जनतेने नाकारलंय असं होत नाही. आम्ही निकालाचे विश्लेषण करू आणि त्यानंतर याबाबतच्या विचारांवर आम्ही आपापसात चर्चा करू. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना कोयनाने म्हटलं होतं की ‘ममता बॅनर्जी यांना देशातील लोकशाहीने चपराक लगावली आहे. तुमचे दिवस भरत आले आहे, रक्ताची होळी आता पुरे झाली’

Leave a comment

0.0/5