काश्मिरी पंडितांसाठी एक आनंद देणारे वृत्त आले आहे. काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी श्रीनगरजवळच्या खीर भवानी आईच्या पूजेसाठी काश्मिरी पंडितांना आमंत्रण पाठवलं आहे. सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या आमंत्रणानंतर काश्मिरी पंडितांना आपल्या मातीशी पुन्हा एकदा नात जोडण्याची संधी मिळणार आहे. १९९० मध्ये धर्मिक अस्मितेच्या वादामुळे लाखो काश्मिरी पंडितांना काश्मिर सोडावे लागले होते. त्यामुळे काश्मिरी पंडित हे वर्ष विसरू शकणार नाहीत. मात्र आता पुन्हा काश्मिरी पंडितांना काश्मिरमध्ये वास्तव्य करायला मिळेल, अशी आशा आहे.
आपल्या दैवताच म्हणजेच आई भवानीचं दर्शन घेता येणार आहे. काश्मिरच्या तरुण पिढीसाठी ही बाब महत्त्वाची आहे. कारण काश्मीरच्या तरुण पिढीला आपल्या संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे. दरम्यान जम्मू-काश्मिर भवनापासून ही यात्रा १० जून रोजी आई खीर भवानीच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे. प्रवाशांचा खर्च आणि सुरक्षेची जबाबदारी राज्यपालांनी घेतली आहे. या यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारला प्रवाशांची संख्या आधीच सोपवलेली आहे.