Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांशी बोललोय, बाकीच्यांनी नाक खुपसू नये-उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांशी बोललोय, बाकीच्यांनी नाक खुपसू नये-उद्धव ठाकरे

शिवसेना वर्धापनदिनी सामना अग्रलेखातून पुढील वर्धापनदिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असे भाष्य करण्यात आले होते. त्यांनतर वर्धापनदिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष युतीमध्ये सगळं समसमान पाहिजे असं म्हणत आगामी काळात युतीची सत्ता आल्यास मुखयमंत्रीपदाचे अडीच-अडीच वर्षे समान वाटप होऊ शकते असे संकेत दिले होते. एवढंच नव्हे तर त्यानंतरच्या सामना अग्रलेखात सुद्धा “ठरल्याप्रमाणे होईल” असं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे शिवसेना-भाजप अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद विभागून घेणार असं चित्र निर्माण झालं होतं.

शिवसेनेकडून अशी भूमिका मंडळी जात असतानाच मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्ट भाष्य करणं टाळलं होतं, पण अवधूत वाघ यांनी कोणी काही छापू देत, पुढील ५ वर्षे मुख्यमंत्रीपद रिकामं नाही असं म्हणत अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला अमान्य असल्याचं दर्शवलं. त्यानंतर मुंबईत भाजपाची बैठक होताच सरोज पांडे आणि गिरीष महाजन यांनी सुद्धा मुख्यमंत्री भाजपचाच होईल असे म्हटले होते.

शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी ?

यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी “मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाध्यक्ष अमित शहांशी बोलणे झाले आहे त्यामुळे इतरांनी मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही” अशा खरमरीत शब्दात भाजपच्या नेत्यांना सुनावले आहे. ते नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री कोणाचा होणार आणि कोण होणार यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे असं म्हणत ज्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आपण सत्तेत येतो ती जनता आनंदी असणं हे सत्ता आणि मुख्यमंत्री यापेक्षा महत्वाचं आहे त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा जनतेच्या प्रश्नांची उत्तरे शोधा अशा शब्दात निरर्थक चर्चा करणाऱ्यांना फटकारले.

Leave a comment

0.0/5